उद्या बुधवार पासून 18 नवीन कोविड लसीकरण केंद्र सुरू

0
239
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यात सर्व पात्र नागरिकांना कोरोना लस वेळेवर मिळावी व लसीकरणकेंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून उद्या दिनांक 10 मार्चपासून जिल्हा प्रशासनातर्फे कोविड लसीकरणासाठी 18 नवीन केंद्र सुरू करण्यात येत आहेत.

नवीन केंद्रात ब्रह्मपुरी ब्लॉक मध्ये अरहेर नवरगाव, मुडझा, मेंडकी व चौगान पीएचसी, चंद्रपूर ब्लॉकमध्ये चिचपल्ली पीएचसी, गोंडपिपरी ब्लॉक मध्ये तोहेगाव पीएचसी, कोरपना ब्लॉकमध्ये मांडवा व नारंदा पीएचसी, मुल ब्लॉकमध्ये चिरोली पीएचसी, नागभीड ब्लॉकमध्ये नवेगाव पांडव व वाढोना पीएचसी, पोंभुर्णा ब्लॉकमध्ये नवेगाव मोरे पीएचसी, सावली ब्लॉकमध्ये अंतरगाव व बोथली पीएचसी, सिंदेवाही ब्लॉकमध्ये मोहाडी नलेश्वर पीएचसी व वासेरा पीएचसी तसेच वरोरा ब्लॉकमध्ये सावरी पीएचसी अंतर्गत शेहाण बुजुर्ग व कोसारसर पीएचसी अंतर्गत आयुर्वेदिक दवाखाना टेंभुर्डा या 18 ठिकाणी कोरोना लसीकरणे केंद्रे सुरू करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.