सुरज बहुरीया गोळीबार प्रकरण | हजारो नागरिकांच्या जनसमुदयाने दिला सुरज’ला अखेरचा निरोप!

0
227
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 

बल्लारपूर : संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवणारी थरारक घटना. काल मुख्य मार्गावर जुन्या बस स्थानकाजवळ अगदी वर्दळीच्या ठिकाणी काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली आहेत. या हल्यामध्ये कुख्यात गुंड सुरज बहुरीया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, घटनेची गांभीर्यता आणि स्वतःची सुरक्षिततेच्या दृष्टीने अवघ्या काही तासात सर्व पाचही आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहेत. सर्व आरोपींना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता, या पाचही आरोपींना १५ ऑगस्ट पर्यंत पीसीआर मंजूर केला आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक खैरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव आणि पोलीस निरीक्षक शिवलाल भगत करीत आहेत.
मृत सुरज बहुरीया मागील काही वर्षांपासून कोळसा तस्करीचा व्यवसाय होता. मात्र, मागील पाच महिन्यांपूर्वी त्याने दारू तस्करीच्या धंद्यात पाऊल टाकले. आरोपी अमन अंनदेवार हा पूर्वीपासून दारू तस्करीच्या व्यवसायात सक्रिय होता. त्यामुळे नव्याने दारू तस्करीच्या व्यवसायात उतरलेल्या सुरज बहुरीया यांच्याविषयी त्यांच्या विषयी वैर निर्माण झाले. मागील काही महिन्यांपासून या दोघांमध्ये लहान-मोठे वाद घडले होते. त्यामुळे दोघेही संधी साधून एक-मेकाचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, योग्य संधी साधून, अमन अंदेवार याने सुराज’च्या हालचालींवर लक्ष दिले. आणि काल बिर्याणी खायला दुपारी दोन’च्या सुमारास सुरज बहुरीया येणार असल्याच्या पक्या माहितीवरून आधीच सापडा रचून कट काढला. हल्लेखोरांनी या हल्यात दोन दुचाकीचा वापर केला एका वाहनांवर दोन तर एका वाहनांवर तीन या प्रमाणे बसून आले आणि बिर्याणी खाऊन गाडीत बसलेल्या सुरज बहुरीया’वर देशी काट्याने सहा राऊंड फायर करीत सुरज बहुरीया’चा खात्मा केला.
आज दुपारी चार’च्या सुमारास हजारो नागरिकांच्या जनसमुदयाने सुरज बहुरीया’ला अखेरचा निरोप दिला. सुरज बहुरीया कुख्यात गुंड जरी असला तारीमात्र, त्याच्या राहत्या परिसरात त्याचा चांगला मोठा जनसंपर्क होता. ते या अंत्यविधीला उपस्थित जमावातून दिसून येत आहेत. मागील दोन दिवसांपासून या थरारक घटनेमुळे या घटनेचा सूड घेण्यासाठी एकादा मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात पोलीस विभागाला अधिक गतिशील व्हावे लागेल, असे मत शहरातील नागरिकांच्या वतीने वर्तविल्या जात आहेत.

आरोपीचे नाव

१ ) आल्फ्रेड उर्फ बंटी लॉजिस्ट अँथोनी वय 19 वर्ष राहणार सरदार पटेल वार्ड, बल्लारपूर

२) प्रणय राजू सैगल वय 22 वर्ष राहणार श्रीराम वार्ड, बल्लारपूर

3) बादल वसंत हरणे वय 19 वर्ष श्रीराम वार्ड, बल्लारपूर

4) अविनाश उमाशंकर बोबडे, वय 22 वर्ष गांधी वार्ड बल्लारपूर

5) अमन उर्फ चिन्हा आनंद अंदेवार वय- २९ वर्ष , डॉ.झाकीर हुसेन वार्ड, बल्लारपूर