दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या पुढाकाराने बँकेच्या संचालकावर व नातेवाइकांवर गुन्हा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

बँकेची लूट करणा-यांची गय केल्या जाणार नाही : अध्यक्ष संतोषसिंह रावत

चंद्रपुर : दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपत्तीची जवाबदारी ज्यांच्यावर आहे त्याच एका संचालकाने बँकेच्या योजनेचा गैरफायदा घेवुन कर्ज रक्कमेची उचल केली. याबाबत माहिती होताच दक्षता घेवुन बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी त्या संचालक व त्याच्या नातेवाईकाविरोधात प्रशासकिय विभागातर्फे कारवाई केली. व बँकेची लूट करणा-यांची गय केल्या जाणार नाही असे यावेळी ठणकावून सांगितले.
दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे सोने तारण गहाण योजना राबविल्या जाते. बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी या योजनेत कमी सोने ठेवले व जास्त सोने असल्याचे दाखवून जास्त कर्जाची उचल केली.

याविरोधात आज (दि.९) ला बँकेच्या प्रशासकिय विभागाने अर्जदार बैंक अधिकारी मारोती पोटे यांच्या मार्फत नागभीड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
यामधे गैरअर्जदार गजानन पाथोडे कर्ज क्र. 471,472, ओमप्रकाश पाथोडे कर्ज क्र. 456, पुष्पदेव ऋषी पाथोडे कर्ज क्र. 478,479, यांनी कर्जखात्यावर सोन गहाण ठेवून कर्ज उचलले. सदर कर्ज हे सोन्याचे मूल्यमापन प्रदिप नांदगुरवार यांनी प्रो.प्रा. पायल ज्वेलर्स, नागभीड यांनी वरील अर्जदार यांचेशी संगणमत करुन कमी सोन तारण ठेवून त्याचे वजन जास्त प्रमाणात दाखवून कर्ज उचल केली व बैंकेची फसवनुक केली. सदर प्रकरण बैंकेच्या संचालक मंडळानी आरबीआयच्या नियमानूसार नेमनुक केलेल्या लेखा परीक्षणानुसार तपासणी केली असता, बैंकेचे संचालक गजानन पाथोडे व त्यान्चे नातेवाइक यांनी बैंकेची फसवनूक केली, हे स्पष्ठ झाले. हे बैंकेचे दवा व असोसिएट आणी चार्टर्ट अकाउंटट यांनी बैकेला कळविले, त्यावर बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत व संचालक मंडळ यांनी बैंकेच्या हिताचा निर्णय घेवून गैरअर्जदार यांचेवर गुन्हा दाखल केला.

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बैंक ही अत्यंत वाईट परीस्थिती असतांना, संतोष सिंह रावत यांनी बैंकचा एनपीए 29% वरुन 31 मार्च 2021 रोजी 13.87% वर आणला. व बैंकचा 21/03/2021 ला बैंकेला 60 कोटी 25 लाख 29 हजार नफा मिळवून दिला, व सर्व तरतूद जाता बैंकचा निव्वड नफा 3 कोटी 39 लाख 69 हजार रु. आहे. हे सर्व करीत असतांना बैंकेचे हित जोपासता संचालक व नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला. व शेतक-याच्या बैंकेचे हित जोपासले. भारतीय दंड संहिता 1960 अन्वये 420, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर केलेल्या कारवाइला दणाणून गैरअर्जदाराने बैंकेची सदर रक्कम खात्यात जमा केली. सर्वकडे बैंकअध्यक्ष व संचालक मंडळाने केलेल्या कारवाईचे कौतुक सुरु आहे. व बैंक सुरक्षित आहे, असे याबाबत अध्यक्ष यांनी कळविले.
अनेक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करुन पाथोडे यांना वाचविण्याचे प्रयत्न केले आहे, मात्र बँकेनी त्यांचे एकले नाही.