विजेचे २०० युनिट मोफत देण्‍याची घोषणा करून पूर्ण न करणा-या आमदाराचा निषेध

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

२०० युनिट मोफत मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील : देवराव भोंगळे

चंद्रपूर : २०१९ च्‍या विधानसभा निवडणूकीपूर्वी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्‍या घोषणापत्रात चंद्रपूरातील जनतेला दर महिन्‍याला विजेचे २०० युनिट मोफत देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. पावणेदोन वर्षानंतर सुध्‍दा सरकारला समर्थन देणा-या या आमदारानी आपले आश्‍वासन पूर्ण करण्‍यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही व जनतेची फसवणूक केली आहे. अशा आमदाराला आपल्‍या पदावर राहण्‍याचा अधिकार नाही असे प्रतिपादन भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे यांनी केले.

२०१९ पासून निवडून येवून चंद्रपूर शहरासाठी कुठलाही नविन प्रकल्प आणण्‍यात चंद्रपूरच्‍या आमदाराला यश आले नाही. अशातच आपल्‍या घोषणा पत्रातुन आमदारानी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला दर महिन्‍याला २०० युनिट मोफत देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. सरकार आल्‍यापासून चंद्रपूरचे आमदार सरकारचे समर्थक म्‍हणून ओळखले जातात. अशावेळेला इतक्‍या प्रचंड बहुमतात असलेल्‍या सरकारकडून २०० युनिट मोफत देण्‍याचे आश्‍वासन पूर्ण न करता जनतेशी विश्‍वासघात करीत आहेत. अशा आमदाराना आपल्‍या पदावर क्षणभरही राहण्‍याचा अधिकार नाही व त्‍यांनी ताबडतोब आमदारकीचा राजीनामा द्यावा, असेही श्री. भोंगळे पुढे म्‍हणाले. याप्रसंगी आमदाराच्‍या विरोधात जबरदस्‍त घोषणाबाजी झाली. याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडू, महासचिव ब्रिजभूषण पाझारे यांनी सुध्‍दा यथोचित मार्गदर्शन केले.

याप्रसंगी आंदोलन करण्‍यासाठी भाजपाचे शेकडो कार्यकर्ते गांधी चौकात जमले. त्‍यावेळी शांततापूर्ण आंदोलन करणा-या भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांना पोलिसांनी अटक केली व आंदोलन चिरडण्‍याचा प्रयत्‍न केला, परंतु भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी न घाबरता स्‍वतःला अटक करून घेतली.

याप्रसंगी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, भाजपा नेते प्रमोद कडू, महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा महानगर महिला जिल्‍हाध्‍यक्षा अंजली घोटेकर, भाजपा महानगर महासचिव ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, सुभाष कासनगोट्टूवार, राहूल घोटेकर, झोन सभापती छबू वैरागडे, शिला चव्‍हाण, आशा आबोजवार, वंदना जांभुळकर, पुष्‍पा उराडे, शीतल कुळमेथे, सविता कांबळे, भाजपा सरचिटणीस नामदेव डाहूले, अनिल डोंगरे, राजीव गोलीवार, किरण बुटले, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्‍लीवार, रवि लोनकर, दिनकर सोमलकर, संदीप आगलावे, प्रज्‍वलंत कडू, सुनिल डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, यश बांगडे, क्रिष्‍णा चंदावार, प्रभा गुडधे, रेणु घोडेस्‍वार, साजीद कुरैशी, सुर्यकांत कुचनवार, सुनिल कोंगरे, गणेश रामगुंडावार, हिमांशु गादेवार, कुणाल गुंडावार, स्‍नेहीत लांजेवार, राम हरणे, अक्षय शेंडे, सत्‍यम गाणार, देवेंद्र बेले, बंडू गौरकार, सुरज सरदम यांची उपस्थिती होती.