आज चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनाचे लोकार्पण

0
176
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील जुना वरोरा नाका चौकात बांधण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे तसेच पवित्र दीक्षाभूमी परिसरात बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण आज रविवारी संपन्न होणार आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात वैशिष्ट्यपूर्ण निधीतून पत्रकार भवनाचे बांधकाम मंजूर करण्यात आले. सदर पत्रकार भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून दुपारी १ वाजता सदर पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पवित्र दीक्षाभूमी परिसरात २ कोटी रुपयांचा निधी खर्चुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्यात आले आहे.
अतिशय आकर्षक व देखणे स्वरूप लाभलेल्या या भवनाचा लोकार्पण सोहळा सायंकाळी ४ वाजता होत आहे. या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.