Gopani Iron & Power (india) Pvt Ltd विरोधात 700 कामगारांचा कामबंद आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : गोपाणी आर्यन अँड पॉवर व्यवस्थापण व कामगारा मधील संघर्ष अगदी टोकाला गेला असून आज सकाळ पाळी पासून कंपनीतील जवळपास चार ठेकेदारांचे सातशे कामगार संपावर गेले आहे. यामुळे उद्योगाचे उत्पादन पूर्णतः ठप्प पडले असून कंपनीला लाखोंचा नुकसान होत आहे.

गोपाणी कंपनीत मागील सतरा वर्षांपासून कार्यरत एकशेवीस कामगारांना 03 सप्टेंबर रोजी कंपनी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता कामावरून कमी केले. कामगारांनी वेतनवाढ मांगीतल्याचा वचपा कंपनीने एकशेवीस कामगारांना काढून घेतला आहे.

या कंपनी मध्ये काही जिल्हास्तराचे राजकारणी ठेकेदार असल्याने त्यांचा पाठबळ हा कंपनीला मिळत असल्याने कंपनीची मुजोरी ही दिवसागणिक वाढत असल्याने कामगारात प्रचंड आक्रोश निर्माण झाला असून त्याची फलश्रुती हे संपावर येऊन पोहचली असून हा वाद जर वेळीच संपुष्टात आला नाही तर औद्योगिक शांती धोक्यात येईल.