मृत्यूस कारणीभूत सहा व्यक्तीवर गुन्हा नोंद, शिरपूर पोलिसांची कारवाई

0
1533
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वणी ( यवतमाळ) : तालुक्यातील नवरगाव शिवारात जिवंत वीज तारेचा  धक्का लागून 13 ऑगस्ट ला सालगड्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शेतमालकाला काही व्यक्तींनी  नाहक त्रास दिल्याने त्यांनी त्याच शेतात 24 ऑगस्टला विष प्राशन केले, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहा व्यक्तीवर मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा नोंद करत एकाला अटक करण्यात आली आहे.
विवेक तोटावार असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव असून तो वणीतील निवासी आहे. नवरगाव येथे मृतक प्रभाकर भोयर यांची शेती आहे. या शेतीची देखभाल करण्यासाठी विलास मोहूर्ले हे मागील अनेक वर्षांपासून सालगडी होते. घटनेच्या दिवशी नेहमी प्रमाणे सालगडी शेतात गेले असता जमिनीवर पडलेल्या जिवंत वीज तारेचा त्यांना स्पर्श झाला यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घडलेल्या अनपेक्षित घटनेने शेतमालक प्रचंड व्यथित झाले होते. त्यातच मृतक विलासचे नातेवाईक व वणी येथील काही व्यक्ती हेतुपरस्पर शेतमालकालाच जबाबदार असल्याचा आव आणत होते. सातत्याने होत असलेल्या छळामुळे शेतमालक प्रभाकर भोयर यांनी दि. 24 ऑगस्ट ला शेतात विष प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारार्थ वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले मात्र दि 9 सप्टेंबर ला नागपूर येथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रभाकर भोयर यांनी व्यथित झाल्याने विष प्राशन केले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असे त्यांच्या परिवाराने गृहीत धरले होते. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर परिवारातील सदस्यांना मृतक प्रभाकर भोयर यांनी मृत्यूपूर्वी लिहलेली चिट्ठी सापडली आणि सर्वच नातेवाईक अचंभीत झाले. याबाबत पारिवारिक सदस्यांनी शिरपूर पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली होती. कारवाईस विलंब होत असल्याने पारिवारिक सदस्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना साकडे घातले. तांत्रिक कारणामुळे गुन्हा नोंद करण्यात अडचणी येत होत्या. शिरपूर चे ठाणेदार सचिन लुले, पीएसआय ध्यानेश्वर ढवळे यांनी सर्व बाबी तपासल्यानंतर मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा नोंद केला. यात एकाला अटक करण्यात आली असून गोपनियते अभावी अन्य पाच ते सहा आरोपीची नावे जाहीर करण्यात आली नाही. मात्र या कारवाई मुळे वणी शहरात खळबळ उडाली आहे.