
नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमिवर १५ ते २१ मार्च दरम्यान नागपूर शहरात कडक लॉकडाऊन लावला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यांनी दिली आहे. नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार नागपूरात 24 तासात १७०० हुन अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यात दवाखाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू रहाणार आहेत. विकएंड कर्फ्यूला जनतेने गांभिर्याने घेतले नाही त्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचेही राऊत म्हणाले. क्वारंटाईन पेशंटही शहरात फिरत असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई लॉकडाऊन काळात कोणालाही विनाकारण फिरता येणार नाही. अशा स्थितीत कोणीही आढळल्यास त्यावर कडक कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. शिवाय पोलीस आयुक्तांना कडक संचार बंदीचे निर्देश ही देण्यात आले आहेत. या कालावधीत खाजगी कार्यालये बंद रहाणार आहेत. तर सरकारी कार्यालये २५ टक्के क्षमतेचे सुरू रहातील असे राऊत म्हणाले.
मद्याच्या ऑनलाईन विक्रीला परवानगीलॉकडाऊन काळात थेट मद्य विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र ऑनलाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. या लॉकडाऊनला जनतेने गांभिर्याने घ्यावे असे ही ते म्हणाले. नागपूरमध्ये एकाच दिवशी मुंबई पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले होते.