काँग्रेस नगरसेवकाच्या घरून देशी दारूचा साठा जप्त

0
1081
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई विशेष पथकाने केली कारवाई

चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे याच्या घरातून 100 पेटी दारू जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ब्रम्हपुरी शहरातील पेठ वार्ड परिसरात असलेल्या घरातून रात्री उशिरा हा दारुसाठा जप्त करण्यात आला.

मुंबई येथून चंद्रपुरात आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने ही कारवाई केली. काँग्रेसचा हा नगरसेवक गेल्या अनेक महिन्यांपासून दारू तस्करीत सामील असल्याची चर्चा होती, पण राजकीय दबावामुळे कारवाई होत नव्हती. यावर उपाय काढण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील विशेष पथकामुळे ही कारवाई शक्य झाली. महेश भर्रे आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल झालाय; मात्र हा नगरसेवक कारवाईच्या वेळी घरी उपस्थित नसल्यामुळे त्याला सध्या अटक करण्यात आलेली नाही. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.