लग्न मोडल्याने नैराश्यातून तरूणाने घेतला गळफास

0
2017

चिमूर तालुक्यातील सोनेगाव येथील घटना

चंद्रपूर : लग्न म्हटला तर सुखाचा आनंदाचा क्षण. या क्षणाची प्रत्येक कुटूंब आतुरतेने वाट पहातो. घरात येणाऱ्या नवधूच्या आगमनाने अख्खे कुटूंब सुखावते. तिचे स्वागत करून नव्या संसाराला सुरूवातही होते. परंतु संसार फुलण्या अगोदरच जर तुटला तर त्याचे दुष्यपरिणामही पहायला मिळते. अशी एक घटना चिमूर तालुक्यातील सोनेगाव येथे घडली. साक्षगंध आटोपला. लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. परंतु वधु मुलीकडून लग्न तुटले. आणि वर मुलगा नैराश्यात गेला. यातून त्याने स्वत:ची जिवनयात्रा संपविली. लग्न तूटल्याच्या नैराश्यातून तरूणाने स्वतःचा शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी गावालगतच्या शेतशिवारात घडली. गजानन फागोजी भोयर (२७) असे तरूणाचे नाव आहे. तो सानेगाव येथील रहिवासी होता.

चिमूर तालुक्यातील सोनेगाव वन निवासी तरूण गजानन फागोजी भोयर ह्याचे काही दिवसापूर्वींच लग्न जोडले होते. त्याचा साक्षगंधाचा कार्यक्रमही उरकला होता. आणि लग्नाची तयारी जय्यत सुरू झाली होती. मे महिण्यात लग्नाची तारीख निश्चीत झाली होती. अख्ये ण कुटूंब आनंदाने लग्नाचे स्वागत करीत होते. परंतु एक दिवस त्या तरूणाचे लग्न तुटल्याची बातमी सोनेगाव येथे येवून पोहचली. आणि त्या तरूणाला धक्काच बसला. अख्खे कुटूंब घटनेने अस्वस्थ झाले.

तरूण घरीच शेतीचे काम करीत असल्याने तो तरूण शेतकरी होता. हा लग्नाचा धक्का तो पचवू न शकल्याने आज बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याने मृत्यूला कवटाळले. गावापासून जवळच असलेल्या सोनेगाव वन शेतशिवारात स्वत:च्या शेतात त्याने झाडाला गळफास घेतली. सकाळी काही नागरिक शेतशिवारात गेल्यानंतर त्याचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत चिमूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेतला. गजाननचा काही दिवसापूर्वीच साक्षगंध झाला होता आणि मे महिन्यात त्याचे लग्न ठरले होते. अचानक लग्न तूटल्याने तो निराश राहत होता. त्याचे घटनेच्या नैराश्यातून त्याचे आत्महत्या करून जिवनयात्रा संपविल्याचे प्राथमिक तपासात सांगितल्या जात आहे. लग्न तुटल्याचा दु:ख होत असले तरी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तरूणाने मृत्यूला कवटाळल्याने सोनेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.