ब्राऊन शुगर तस्करीत एका महिलेला अटक ; 3 दिवसांची पोलीस कोठडी

0
521

चंद्रपूर : शहरातील वरोरा नाका चौकात 8 मार्चला
लालपेठ निवासी अजय रविदास नामक युवकांकडून 25 ग्राम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले होते.या प्रकणात आणखी एका महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे. चित्रा ठाकूर असे महिला आरोपीचे नाव असून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दारूबंदी नंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या मादक पदार्थाच्या तस्करीबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत नागपूरातील ब्राऊन शुगर तस्कर महिला चित्रा ठाकूर यांना अटक केली. आज गुरूवारी आरोपी ठाकूर यांना न्यायालयात हजर केल्या गेले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.