• पतसंस्थेचा शिपाईच निघाला चोर
चंद्रपूर : ब्रह्मपुरी येथील रंगनाथ स्वामी पतसंस्था (वणी शाखा) मध्ये 5 लाख 25 हजार 140 रुपये चोरी घटना अवघ्या सहा तासात ब्रह्मपुरी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. 11 फेब्रुवारीला ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये चोरी बाबत तक्रार प्राप्त झाली होती. शिपाई गराडे असे आरोपीचे नाव असून तो पंतसंस्थेमध्येच शिपाई या पदावर कार्यरत आहे.
पतसंस्थेचे व्यवस्थापक आनंद वसाके यांनी, 11 फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारीत त्यांनी, सकाळी 9.30 वाजता बँकेतील शिपाई राजू गराडे यांनी फोन करून माहिती दिली की पतसंस्थेत सीसीटीव्ही मॉनिटर, केबल व कॅश ठेवलेला ड्रॉप हा उघडा असून त्या मधील कॅश गायब आहे. पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी संस्थे मध्ये येवून चौकशी केली असता 10 फेब्रुवारीला झालेल्या ऑडिट मधील 5 लाख 25 हजार 140 रुपयांची रक्कम गहाळ झाली झाल्याचे निदर्शनास आले. लगेच त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये ठाण्यात तक्रार दाखल केली.
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने पतसंस्थेत पोहचून पंचनामा केला. त्यांनतर पतसंस्थेतील काही कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यानंतर शिपाई गराडे यांच्या घरी चौकशी केली असता. त्यांच्या घरी 5 लाख 25 हजार 140 रुपये व गुन्ह्यात वापरलेली लोखंडी सळाख पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी ती रक्क्म जप्त केली. शिपाई गराडे यांनी मोठ्या शिताफीने पतसंस्थेतील शटर उघडत सीसीटीव्ही बंद करीत पतसंस्थेतील रक्कम चोरी केली व कुणाला संशय जाऊ नये यासाठी तो मी नव्हेचं अशी भूमिका घेतल्याचे चौकशीत उघडीस आल्याने ब्रह्मपुरी पोलिसांनी अवघ्या 6 तासात चोरी प्रकरण उघडकीस आणले.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, स्वाती फुलेकर, अरुण पिसे, डीबी पथकातील अमोल गिरडकर, योगेश शिवणकर, संदेश देवगडे, अजय कटाईत, मुकेश गजबे, विजय मैंद, शुभांगी शेमले यांनी यांनी केली.