चंद्रपूर मनसे शहरअध्यक्ष मनदीप रोडे सह 7 जणांना अटक

0
619

चंद्रपूर : 17 फेब्रुवारीला WCL अंतर्गत काम करणाऱ्या GRN कन्स्ट्रक्शन कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीवर मनसेचे शहराध्यक्ष मनदीप रोडे यांनी आंदोलन केले, मात्र काही वेळेनंतर हे आंदोलन चांगलेच चिघळले होते.

आंदोलनात GRN कम्पणीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, मात्र घटनेनंतर रोडे हे पसार झाले होते. तोडफोड प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी रोडे यांचेवर गंभीर गुन्हे दाखल केले होते, त्या गुन्ह्याची योग्य चौकशी पोलीस प्रशासनाने करावी अशी मागणी मनसेचे महाराष्ट्र सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदनाच्या माध्यमातून केली होती.

12 मार्चला मनदीप रोडे सह 7 जणांना अटक करण्यात आली, तब्बल 1 महिना अटकपूर्व जामिनासाठी रोडे यांनी प्रयत्न केले मात्र त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.