चंद्रपूर : गडचांदुर पोलीसांनी पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी गोपनिय माहितीच्या आधारे नाकेबंदी करून दोन 6 चाकी ट्रक MH – 40 BL – 1079 तसेच TS – 07UB – 0472 हे ट्रक थांबवुन त्यामध्ये असलेले 26 गायी, 22 बैल ( गोरे ) असे एकुण 48 गोवंशीय जनावरे अंत्यत निर्दयतेने व कृरतेने वाहनामध्ये कोंबुन भरून कत्तल करण्याचे इरादयाने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने सदर जनावरांची सुटका करून जनावरांना सुरक्षित पणे श्रीकृष्ण गो शाळा व सेवा संस्था गोंडपिपरी येथे दाखल केले.
पोलीसांनी एकुण 48 जनावरे किमत अंदाजे 5,12,000 रूपये दोन सहा चाकी ट्रक किंमत 20 लक्ष रू. असा एकुण 25 लक्ष 12 हजार रूपये चा माल जप्त केला. व वाहनामध्ये असलेले चालक 1 ) सिराज बक्सुदिन पठाण वय 24 वर्ष रा . राजेंद्र नगर जि . रंगारेडडी (तेलगांना) 2 ) शेख सारीक शेख मुर्रा वय 26 वर्ष रा . गडचांदुर वार्ड क . 43 ) फारूख खान गफार खान वय 22 वर्ष रा. गडचांदुर वार्ड क. 04 यांना अटक केले तसेच फरार वाहन चालक संजय शंकरराव वालदे रा. कलोडे भवन हिंगणघाट जि.वर्धा यांचे विरूध्द तसेच जनावर मालक ईमारण शेख रा. गडचांदुर असे एकुण पाच आरोपी विरूध्द पोस्टे गडचांदुर येथे अप. क्र. 218/2021 कलम 11 ( 1 ) ( ड ) भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविणे प्रतिबंध अधिनियम -1960 सह कलम 5 ( अ ) , 5 ( ब ) , 9 , 11 महाराष्ट्राचा प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारीत 2015 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही सुशिल कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदुर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल भारती, नापोशि धर्मराज मुंडे, सुभाष तिवारी, पोशि प्रभु मामीडवार, व्यकटेश भटलाडे यांनी पार पाडली.