वैद्यकीय अधिकारी सह कुटुंब कोरोना संक्रमित

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस येथे एकाच दिवशी 13 पॉजीटीव्ह

घुग्घुस (चंद्रपूर) : कोरोना रुग्णाची जिल्ह्यातील वाढती संख्या ही धोकादायक होत असतांना 12 संप्टेंबर रोजी घुग्घुस येथे एकाच दिवशी तब्बल 13 कोरोना संक्रमित मिळाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.  औद्योगिक नगरी घुग्घुस येथे कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या 115 झाली आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदकीय अधिकारी त्यांची पत्नी सह चिमुकला बाळ ही संक्रमित झाला असून
प्राथमिक आरोग्य केंद्रातील 50 पैकी 20 कर्मचारी हे कोरोना बाधीत झालेले आहे.

मागील 05 संप्टेंबर रोजी येथील 50 वर्षीय रुग्णसेविका ह्या संक्रमित आढळुन आल्या होत्या त्यानंतर 10 संप्टेंबर ते 15 सप्टेंबर आंतररुग्ण सेवा व OPD सेवा बंद करण्यात आलेले आहे.

घुग्घुस शहर हा औद्योगीक असल्यामुळे येथे मोलमजुरी करणारे व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गरीब वर्गातील नागरिकासह प्रसूती व गरोदर महिलांच्या उपचारांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे