आवरपुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शेतकरी संघटनेच्या प्रियंका दिवे तर उपसरपंचपदी बाळकृष्ण काकडे

0
163
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

सरपंच पदाच्या निवडणुकीत महा ग्राम विकास आघाडीच्या प्रियंका दिवे बाळकृष्ण काकडे विकास दिवे कानोबा भोंगळे सुषमा पा नघाटे सुरेश दिवे नंदा सुर यांनी सरपंचपदासाठी समर्थन दिले.

नांदा फाटा (चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आवारपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी संघटनेच्या प्रियंका दिवे तर उपसरपंचपदी बाळकृष्ण काकडे यांची निवड करण्यात आली. शेतकरी संघटना मनसे शिवसेना गोंडवाना गणतंत्र पार्टी समर्पित महा ग्राम विकास आघाडी तयार करून अत्यंत चुरशी च्य्या वातावरणात लढत झाली होती. यात सत्ताधारी काँग्रेसला केवळ चार सदस्यांवर समाधान मानावे लागले.

शेतकरी संघटन चे पाच मनसे एक शिवसेना एक सदस्य असे संख्याबळ तयारकरून सत्ताधारी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाग्रमविकास आघाडीला अखेर यश आले.तर मनसेचे बंडखोर सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीच्या अका सदस्याने काँग्रेस ला पाठिंबा दिल्याने अनेकांची दमच्याक झाली. मात्र इतर दोन सदस्य कायम रहल्याने शेतकरी संघटनेला बाजी मार ता आली. माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रभाकर दिवे मनसे नेते प्रकाश बोरकर कामगार नेते साईनाथ बुचे माजी सरपंच ल टा री ताजने सुधाकर कुसरा म तथा गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या कार्यकर्त्यांनी अथकपरिश्रमातून ग्रामपंचायतीच्या सत्ता बदल केला. यात शिवसेनेची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरली. पाच वर्षानंतर पुन्हा शेतकरी संघटनेला या ग्रामपंचायतीवर झेंडा फडक वी त आला आहे.