सिलेंडर घेऊन जाणारा मिनीमेटॅडोर पलटला; एक ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर  वरून ऑक्सिजन सिलेंडर ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना रात्री 2 वाजेदरम्यान नागभीड हद्दीतील कोर्धा गावाजवळ सदर चारचाकी वाहन क्रमांक MH34 AV 2027 च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले.
या अपघातात मागील बाजूस बसलेल्या सागर वेट्टी याच्या अंगावर सिलेंडर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर वाहन चालक सुशांत सोरदे हा किरकोळ जखमी झाला.

28 वर्षीय मृतक सागर वेट्टी हा नगिनाबाग येथे राहत होता, काही काम नसताना सागर हा फक्त मित्रांसोबत ब्रह्मपुरी येथे जाण्यासाठी तयार झाला मात्र तो गेला पण परत आला नाही.

वाहनचालक सुशांत सोरदे वर 279, 304 (अ) कलम 184 मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विन खेडीकर करीत आहे.