चंद्रपूर : येथील वनविभाग तपासणी नाक्यावरून तेंदूपत्ता घेऊन निघालेला एमएच ३४ बिजी ६१११ क्रमांकाचा ट्रक आष्टी येथील वैंनगंगा नदीपुलावर चालकाचा वाहनवरील नियंत्रण सुटल्याने नदीपुलावरून विरूद्ध दिशेला खाली पाण्यात कोसळून अपघात झाल्याची घटना आज १३ जून रोजी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातात चालक व क्लीनर कमलेश सलविंदरसिंग सलूजा, नितिन दीपक बीके रा.किसाननगर दोघेही जागीच ठार झाले तर कामगार अजय कारपेनवार हा सुखरूप बचावला असून त्याला आष्टी ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर ट्रक हा हरमन ट्रान्सपोर्ट बल्लारपूर येथील असून तो सिरोंचा बामणी येथून बल्लारपूरला निघालेला होता.
दरम्यान एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढून सदर ट्रक मध्ये दोघेच होते समजून कामगाराला क्लिनर समजून त्याचा बयान नोदवन्यासाठी रुग्णालयात गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना सदर कामगाराने मी क्लीनर नसून कामगार आहे चालक हा झोपी गेला होता क्लीनर वाहन चालवत होता त्यामुळे घटनास्थळावर अजुन एकाचा शोध सुरु केल्यानंतर परत एक मृतदेह सापडला, त्यामुळे मृतकांची संख्या दोन झाली.
पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठौड़ यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस करीत आहेत.