पुलवामा शहिदांना काँग्रेस तर्फे मानवंदना

0
164

घुग्घूस : 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्याच्या अवंतीपपोरा के लेथपोरा मध्ये सुरक्षा दलाच्या (CRPF) वाहनावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात 45 जवान शहीद व 35 जवान जखमी झाले होते.

घुग्घूस काँग्रेस कमेटी तर्फे 14 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता शहिदांच्या प्रतिकाला पुष्पगुच्छ व मेंणबत्ती वाहून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली ‘ शहीद जवान अमर रहे” भारत माता की जय, जय जवान जय किसानचा उद्घोषणा देण्यात आली.

याप्रसंगी घुग्घूस काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजुरेड्डी, रोशन पचारे (काँग्रेस किसान सेल जिल्हाध्यक्ष) पवन आगदारी (जिल्हाध्यक्ष काँग्रेस अनुसूचित जाती विभाग ) सैय्यद अनवर (कामगार नेते)तौफिक शेख (युवक अध्यक्ष) अजय उपाध्ये, प्रफुल हिकरे,जावेद कुरेशी, बालकिशन कुळसंगे, शहजाद शेख, प्रेमानंद जोगी,सचिन कोंडावार,देव भंडारी, साहिल सैय्यद, सुधाकर जुनारकर,अंकेश मडावी, सुनील पाटील,बबलु मुंढे,सुब्बाराव अटेला, संपत कोंकटी, कुणाल दुर्गे, व मोठ्या संख्येने उपस्थित होते.