ब्राउन शुगरसह पुन्हा दोन आरोपी अटकेत;  स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर : दारूबंदी नंतर जिल्ह्यात गांजा, ब्राऊन शुगर ची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून तरुण या मादक पदार्थाच्या विळख्यात येत आहे.स्थानिक गुन्हे शाखेने आज रविवारी पुन्हा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 55 हजारांचा ब्राऊन शुगरसह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे,शहरातील भिवापूर वार्डात एकाने घरी ब्राऊन शुगर विक्रीकरिता साठवणूक केल्याची खबर मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत भिवापूर येथील 35 वर्षीय आवेश शब्बीर कुरेशी मु. भंगाराम चौक याचे घरी धाड मारीत झाडाझडती घेतली असता 130 पुड्या तब्बल 42.340 ग्राम व ब्राऊन शुगर 12.350 ग्राम जप्त करण्यात आली.

आरोपीने हे ब्राऊन शुगर बाबूपेठ येथील 31 वर्षीय नैनेश उर्फ लाला नितेश शाहा यांचेकडून विकत घेत दोघे मिळून हा व्यवसाय करत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.ही तस्करी नागपूर व्हाया मुंबई येथून आली असल्याची माहिती आरोपीतर्फे मिळाली. पोलिसांनी दोघांना अटक करीत आरोपिकडून ब्राऊन शुगर किंमत 55 हजार, रोख रक्कम 1 लाख 36 हजार 460 व मोबाईल किंमत 10 हजार असा एकूण 2 लाख 1 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दोघांना न्यायालयात नेले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे, गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघमारे, विजय कोरडे, बाबा डोमकावले, दौलत चालखुरे, महेंद्र बेसरकर, शारीफ शेख, विलास निकोडे, जयंत चुणारकर आदींनी यशस्वीपणे पार पाडली.