पतीने मोबाईलचा हट्ट न पुरविल्याने पत्नीची आत्महत्या

0
680
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• 8 महिने आणि 2 वर्षाचे मुले झाले पोरके

चंद्रपूर : सध्या स्मार्टफोनचे फॅड आहे. प्रत्येकांकडे काहीही नसो पण स्मार्टफोन असो,अशी इच्छा असतेच. स्मार्टफोन मिळविण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो, परंतु फोन घेण्याची इच्छा जर पूर्ण झाली नाही तर कुणीही आपला जिव देईलअशी कल्पना करता येईल का? नाही. मात्र चंद्रपूर पासून जवळच असलेल्या घुग्घूस शहरात हिमाचल लाईन शास्त्रीनगरात एका विवाहितेने पतीने मोबाईलचा हट्ट पुरविला नाही म्हणून गळफास घेवून आत्महत्या केल्याची हद्रयद्रावक घटना आज मंगळवारी 16 मार्च ला उघडकीस आली आहे. लक्ष्मी सुरेश कुम्मरी असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिला असलेल्या 8 महिण्याचा व 2 वर्षाचे दोन्ही मुले मातृत्वापासून पोरकेझाले आहेत.

घुग्घूस शहरातील हिमाचल लाईन शास्त्रीनगर परिसरात सुरेश कुम्मरी हे राहतात. त्यांचा पेंटिंगचा काम आहे. त्याच कामाच्या भरवश्यावर पत्नी लक्ष्मी, 8 महिणे आणि 2 वर्षाचा असे दोन मुलांचे पालनपोषण करीत आहेत. त्यांच्या मिळकतीवरच संसाराचा गाडा आणि परिवाराच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करीत आहेत. दरम्यान पत्नी लक्ष्मीने काही दिवसांपासून पतीकडे आपल्याला मोबाईल घेऊन देण्याबाबत हट्ट धरला होता. परंतु सध्या पतीकडे पैसे नसल्याने त्याने पत्नीला थांबण्यास सांगितले होते. मात्र ती मोबाईलचा हट्ट बाळगून असल्याने शेवटे दोन दिवस थांबण्यास सांगितले होते. दरम्यान आज पतीने तिला मोबाईल घेऊन देण्यासाठी तयार केली होती. परंतु आज मोबाईल घेण्यापूर्वीच पत्नीने आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घरीच गळफास घेवून आत्महत्या केली. पती घरी आल्यानंतर घटना त्याच्या लक्षात आली. लगेच त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान पोलिसांनी सदर आत्महत्येबाबत चौकशी सुरू केली असता, धक्कादायक कारण पुढे आले. पतीने आपल्या बयानात मोबाईलसाठी पत्नीचा अट्टाहास होता. परंतु मोबाईल घेण्यासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने वेळेवर घेऊन देता आले नाही. मात्र आज मंगळवारीच आपण तिला मोबाईल घेऊन देण्याची व्यवस्था केली होती. आपल्या कामाचे पैसे घेऊन आलो होतो, परंतु त्या अगोदरच तिने घरीच स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची कबुली पोलिसांत दिली आहे. विवाहितेच्या पश्चात 8 महिन्याचा तान्हुला आणि 2 वर्षाच्या मुलगा आहे. मात्र आईच्या चुकीच्या निर्णयामुळे दोन्ही बाळ आता मातृत्वापासून पोरके झाले आहे. पत्नीने अनाठायी कारणासाठी अट्टाहास करून पती व चिमुकल्यांना सोडून जिवनयात्रा संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यकत् केल्या जात आहे.