खर्रा आणायला गेलेल्या महिलेवर अत्याचार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपुर : रात्रीच्या वेळी पानठेल्यावर खर्रा आणायला गेलेल्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना काल मंगळवारी (१३ जुलै) च्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान तालुक्यातील घोसरी या गावात घडली.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील घोसरी येथील एक विवाहित महिला रात्री पानठेल्यावर खर्रा आणायला गेली. रात्री अंधार असल्याने त्याच गावातील विनायक बबन नगराळे (४०) याने सदर महिलेस कुठे गेली होती अशी विचारणा करत तिला जबरदस्तीने उचलून जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडा-ओरड करताच तिचा मुलगा व पती धाऊन आले. त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला. आज बुधवारी १४ जुलै रोजी पिडीत महिलेने भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी विनायक नगराळे यास अटक केली असून त्याच्याविरुद्ध भा.दं.वि.३७६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान,महिलांवर अत्याचार करण्याच्या आरोपाखाली अटक होण्याची तालुक्यातील तीन दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी दि.११ जुलै रोजी भद्रावती शहरातील डोलारा तलाव वस्तीतील अशोक नथ्थू वनकर या आरोपीस नाबालिक मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.