“Jay” ने शोधला शुभम फुटाणेचा मोबाईल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• ड्रीम लँड सिटी परिसरातून मोबाईल ताब्यात

चंद्रपूर : घुग्घूस येथील रामनगर वेकोली वसाहतीतील इंजिनियरींगचा विद्यार्थी शुभम फुटाणे हत्या प्रकरणात आज सोमवारी 15 फेब्रुवारी 2021 ला पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांचे नेतृत्वात डॉग स्कॉट आणि बिडीडीएस पथकाने तपास केला.

डॉग स्कॉटने ड्रीम लैंड सिटी नजीकच्या शेतशिवारातील घटनास्थळावरून मोबाईल शोधून काढला तर बिडीडीएसच्या पथकाने तपासणी नंतर पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला. सदर मोबाईल शुभमचा असल्याची खात्री झाली आहे.

17 जानेवारीला अपहरणाच्या दिवशी शुभमच्या सुटकेसाठी याच मोबाईल वरून आरोपीने खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्यांनतर त्या मोबाईल वरून कधीच संपर्क करण्यात आलेला नाही. तपासवेळी आरोपी गणेश पिंपळशेंडे हा शुध्दा पोलिसासोबत होता.

शनिवारी शुभम दिलीप फुटाणे हत्या प्रकरण उघडकीस आल्यांनतर आरोपी गणेश पिंपळशेंडे याला अटक करण्यात आली. काल रविवारी न्यायालायाने आरोपीला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर घुग्घूस पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. पोलिस कोठडीच्या दुस-या दिवशी आज पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी या घटनेच्या तपासाचा आढावा घेतला. दुपारी तीनच्या सुमारास घुग्घूस पोलिस ठाण्यात पोलिस अधिक्षकासमोर तपासी अधिकारी ठाणेदार राहूल गांगूर्डे यांनी आरोपी कडून हत्या प्रकरणाबाबत अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता. ड्रिम लँड सिटी परिसरातील शेत शिवारात शुभमचा मोबाईल फेकल्याची माहिती दिली. मात्र हत्या कोठे ? केव्हा केली ? कसी केली ? हत्या प्रकरणात आरोपी एकटाच आहे का? सोबतच हत्या प्रकरणात पोलिसांनी हवी असेलेली माहिती आरोपी कडून मिळालेली नाही.

आरोपी मोबाईल बाबत दिलेल्या माहिती नंतर डॉग स्कॉटला ड्रिम लँड सिटी परिसरातील शेत शिवारात नेण्यात आले. (Jay) डॉगने शेतशिवार हुडकून काढत मृत शुभम फुटानेचा मोबाइल शोधून काढला. तत्पूर्वी बि.डी.डी.एस पथकाने मेटल डिडेक्अरने त्याची तपासणी केली. त्यांनतर मोबाईल ताब्यात घेण्यात आला. डॉग स्कॉटने पोलिस कोठडीच्या दुस-या दिवशी मोबाईल शोधून काढल्याने त्यातील कॉल डिटेल्स नंतर बरीच माहिती पोलिसांच्या हाती लागणार आहे.

पोलिस कोठडीला फक्त दोन दिवस उरलेले असून आरोपीकडून हत्या केल्याची खात्री झाली असली तरी हत्या कुठे, केव्हा आणि कशी केली. यात एकाच आरोपी आहे की जास्त याचाही शोध पोलिस करीत आहेत. मोबाईल ज्या परिसरातून शोधून काढण्यात आला त्याच ठिकाणी शुभम फुटाणेची हत्या करण्यात आल्याचा शंसय पोलिसांकडून वर्तविल्या जात आहे.