मॉर्निंग वॉकला जाणा-या नागरिकांवर अस्वलाचा हल्ला सुरूच ; पुन्हा एक जण जखमी

0
6

चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा गेटबाहेर जमनजेट्टी माना टेकडीजवळ गेलेल्या एकावर अस्वलाने हल्ला केल्याने ते जखमी झाले. मधु गंगाराम आत्राम , लालपेठ जूनी बस्ती , चंद्रपूर असे जखमीचे नाव आहे. ही घटना आज सोमवारी सकाळी सहा वाजताचे सुमारास घङली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथकाने घटनास्थळी जावून जखमीला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. काही दिवसांपासून माना-लालपेठ परिसरात अस्वलाचा वावर सुरू आहे. मागील आठवड्यात सुनील लेनगुरे, महादेव गुड्डीटीवार यांना जखमी केल्याची घटना ताजीच आहे.

पठाणपुरा गेटबाहेर या वेकोलिच्या ओव्हरबर्डन परिसरातील झाडीझुडपे तातडीने काढण्याची मागणी विभागीय वनाधिकारी सारिका जगताप यांच्याकडे इको-प्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी केली आहे. पठाणपुरा गेटबाहेरील जमनजट्टी परिसरात ‘मॉर्निंग वॉक’करिता नागरिक येत असतात. परिसरात यापूर्वी तीन बिबट २०१३मध्ये पकडण्यात आले होते. मागील वर्षी माना परिसरात वाघाचा वावरही दिसून आला. परिसरात वाढलेले काटेरी बाभळीचे झुडूप यास कारणीभूत ठरत असल्याकडेही धोतरे यांनी लक्ष वेधले आहे.

Twitter
WhatsApp
Telegram
Pinterest
ReddIt
Email
Linkedin
Previous articleघुग्घुस येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रारंभ; पहिल्या दिवशी केल्या गेले एकूण 99 लोकांचे लसीकरण
Editor- K. M. kumar