एकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

गडचिरोली : अवघ्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल २० जणांचा बळी घेतला. यातील अर्ध्याहून अधिक लोक दुसऱ्या जिल्ह्यातील असले तरी ते उपचार घेण्यासाठी गडचिरोलीत दाखल झाले होते. मृत्यूच्या या तांडवासोबतच नव्याने कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांनीही मंगळवारी विक्रमी, म्हणजे एकाच दिवशी ३७० चा आकडा गाठला. आतापर्यंतच्या कोरोनाकाळातील ही जिल्ह्यातील सर्वाधिक भीषण स्थिती ठरली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यासाठी ११ महिने झाले आहेत. पण कोरोना पॉझिटिव्हचा आकडा इतका कधीच फुगला नाही. १५ दिवसांपूर्वीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारच्या वर कधीच गेली नव्हती. मात्र गेल्या १५ दिवसात मृत्यू आणि नवीन बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. आता सक्रिय रुग्ण २ हजारच्या उंबरठ्यावर पोहोचले असून सध्या त्यांची संख्या १९११ आहे. या भिषण स्थितीतही मंगळवारी गडचिराेलीचे मार्केट सुरू हाेते.
नवीन ३७० बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १५०, अहेरी तालुक्यातील २३, आरमोरी २०, भामरागड तालुक्यातील १९, चामोर्शी तालुक्यातील २०, धानोरा तालुक्यातील २६, एटापल्ली तालुक्यातील १०, कोरची तालुक्यातील ११, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये २१, मुलचेरा तालुक्यातील ५, सिरोंचा तालुक्यातील ३५ तर वडसा तालुक्यातील ३० जणांचा समावेश आहे.
कोरोनामुक्त झालेल्या १०८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ४४, अहेरी १०, आरमोरी २, मुलचेरा १, भामरागड २०, चामोर्शी ८, धानोरा १, सिरोंचा ३, कोरची २, कुरखेडा ३ तसेच देसाईगंज तालुक्यातील १४ जणांचा समावेश आहे.