चंद्रपूर : जिल्ह्यात 24 तासात जिल्ह्यात 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 58 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 58 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 3, बल्लारपूर 5, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 1 , नागभिड 0, सिंदेवाही 1, मूल 2, सावली 0, पोंभूर्णा 4, गोंडपिपरी 0, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 3, कोरपना 12, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 20 रुग्णांचा समावेश आहे.
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड येथील 75 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील राजेंद्र प्रसाद वार्ड येथील 72 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील आंबेडकर वार्ड येथील 49 वर्षीय पुरुष तर गडचिरोली जिल्हयातील आरमोरी येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 301 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 81 हजार 997 झाली आहे. सध्या 797 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 22 हजार 256 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 34 हजार 893 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 1507 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1393, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 42, यवतमाळ 52, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.