चंद्रपूर | लसीकरण मोहिम १०० टक्के यशस्वी होणार – आ. किशोर जोरगेवार

0
198
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्यात हि लस आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या कोरोना योध्दांना देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व सामान्यांनाही लस देण्यात येणार आहे. या करीता यंत्रणा सज्ज असून कोविड -१९ चा पराजय करण्याची हि मोहिम अधिकारी व कर्मचा-यांच्या उत्तम नियोजनातुन १०० टक्के यशस्वी होणार असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

आज पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून या करीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वळखेळकर, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गलहोत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, आय.एम. ए चे अध्यक्ष अनिल माडूलवार यांच्यासह इतर अधिका-यांची उपस्थिती होती.

आज कोविशिल्ड या लसीची पहिली डोज आरोग्य सेवेतील ९ हजार कर्मचा-यांना देण्यात आली. २८ दिवसानंतर या लसीचा दुसरा डोज दिल्या जाणार आहे. आज या उपक्रमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या तयारीची माहिती जाणून घेत नियोजनाचे कौतूक केले. आजवर ची ही सर्वात मोठी मोहिम असून ती यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागासह संबधीत सर्व विभाग युध्द पातळीवर काम करत आहे. या मोहिमेत शासन स्थळावर येणा-या अडचणी सोडविण्यासाठी आम्हीही कटिबध्द असल्याचे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगीलते.या लसीची प्रतीक्षा देशवासीयांना होती. हि लस आता तयार झाली आहे. मात्र ती सर्व सर्वसामान्यांन पर्यन्त पोहचविण्याचे मोठे आव्हाहन प्रशासनासमोर आहे. आरोग्य विभाग व संबंधित सर्व विभागातील कर्मचारी हे आव्हाहन स्वीकारून हि मोहीम यशस्वी रित्या पार पाडतील अशी आशाही यावेळी आ. जोरगेवार यांनी व्यक्त केली.