पालकमंत्री यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे लोकार्पण

0
255

नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कृषी विरोधातील तीन काळे कायदे परत घेण्यासाठी राजभवनाला घेराव करण्यात आला.

या आंदोलनात घुग्घुस काँग्रेस कमिटी, किसान सेलचे पदाधिकारी, अनुसूचित जाती सेलचे पदाधिकारी ही मोठ्या संख्येने सहभागी झाले आंदोलना नंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवारजी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार व शिवानी ताई वड्डेटीवार प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस यांच्या हस्ते नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी घुग्घुस काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, बालकिशन कूळसंगे उपस्थित होते