◆ दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व रवि शिंदे यांचा उपक्रम
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील मुधोली येथील आठवडी बाजाराच्या दिवसी आज (दि.१६) ला ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या., चंद्रपुरचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवि शिंदे यांनी राबविले.
सर्वप्रथम दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘शेतकरी कल्याण निधी’ या योजनेअंतर्गत चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग चंदनसिंग रावत यांचे पुढाकाराने व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार रविंद्र शिंदे यांच्या माध्यमातून आज (दि.१६) ला भद्रावती तालुक्यातील मुधोली येथील सर्पदंशाने व वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या वारसानांना आर्थीक सहकार्य देण्यात आले. त्यानंतर रवि शिंदे यांच्या स्वनिधीतूनही मृतांच्या वारसानांना सानुग्रह आर्थीक मदत करण्यात आली व मृतकांच्या वारसान मुलांच्या शिक्षणाकरीता मदत करण्याचे जाहीर केले. मुधोली येथील चैतन्य बबन जिवतोडे या युवकाचा सर्पदंशाने, भारत रामाजी बावणे यांचा वाघाच्या हल्ल्यात व प्रकाश श्रीहरी घरत यांचा कोरोनाबाधित होवून मृत्यू झाला.
या घटनेची दखल घेवुन मृतांचे वारसान बबन काशीनाथ जिवतोडे व जनाबाई भारत बावणे यांना दहा हजार रुपये रोख रकमेचा धनादेश बँकेकडून वितरीत करण्यात आला व रवि शिंदे यांच्या स्वनिधीतून शांता प्रकाश घरत यांना सानुग्रह आर्थीक मदत करण्यात आली. सोबतच रवि शिंदे यांनी मृतकांच्या वारसान मुलांच्या शिक्षणाकरीता मदत करण्याचे जाहीर केले.
दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी शेतमजुरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असून रवि शिंदे यांचे सामाजिक बांधीलकी जोपासत गरजुंकरीता मदतकार्य सुरु आहे.
त्यानंतर मुधोली येथील आठवडी बाजार लक्षात घेता रवि शिंदे यांनी ग्रामीण जनतेत कोविड-१९ बाबत जनजागृती केली व मास्क तथा सॅनिटायजर वाटप केले. शेतीचा हंगाम सुरु आहे व तिसरी लाट येन्याची शक्यता लक्षात घेता ग्रामीण परीसरात जनतेनी सतर्क राहण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. सोबतच आठवडी बाजार निमीत्त विनामास्क येणा-या व्यापा-यांना ग्रामीण भागात ‘नो एण्ट्री’ चा ग्रामस्थांनी यावेळी निर्णय घेतला.
याप्रसंगी दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे, सामाजिक कार्यकर्ता वसंता मानकर, मुधोली ग्रा.प. चे सरपंच बंडू नन्नावरे, माजी समाजकल्याण सभापती तुळशिराम श्रीरामे, माजी सरपंच केशवराव जांभुळे, वर्षा रणदिवे, कु. मोनाली घरात, यशवंत गायकवाड, बैंकेचे निरीक्षक पवन ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी संपन्न कार्यक्रमाचे मार्गदर्शन करतांना रवी शिंदे यांनी बैंकेच्या विविध कल्याण योजनेवर मार्गदर्शन केले. या शिवाय धानाचे पुंजने जळून नुकसान होणे, बैल मृत्युमुखी पडणे, वीज पडून जीवहानी होणे, जंगली जनावराच्या हल्यात मृत्यू होणे अशा घटना घडल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून घ्यावी व कोविड-१९ च्या तिस-या लाटेपुर्वी सावध होवून काळजी घेण्यासाठी आवाहन बैंकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी केले.