दारू पाजली आणि… प्रियकराणे केला प्रियसीचे पतीचा खून

तीन तासांत आरोपी अटकेत ; एलसीबीची कारवाई

चंद्रपूर : पडोली पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सिनर्जी सिनर्जी वर्ल्ड परिसरात एका इसमाचा मृतदेह शनिवारी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. पोलिस तपासात अनैतिक संबंधातून खून केल्याचे समोर आले. राजू अनंत मलिक (४५) असे मृताचे नाव आहे.

सिनरर्जी वर्ल्ड परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतकाची ओळख पटली नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिक्षकांना खाडे यांच्याकडे सोपविला. शहरातील अनेक भागांत या मृतकाचे छायाचित्र दाखवून ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तेव्हा पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे यांना मृत हा राजू मलिक असून तो अष्टभुजा वॉर्डातील रहिवासी असल्याचे समोर आले. तपासात मृतकाच्या पत्नीचे जितेंद्रसिंग भंडारी यांच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. जितेंद्रसिंग मृत आणि त्याच्या पत्नीच्या सतत संपर्कात असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले.

दुर्गापूर परिसरातून त्याला पोलिसांना ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तर दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जितेंद्रसिंगचे मृताच्या पत्नीसोबत मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. राजूची पत्नी मागील एका वर्षांपासून मुलासह तिच्या माहेरी कान्केर येथे गेली होती. त्या दोघांच्या प्रेमसंबंधामध्ये मृतक अडसर ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यात आला. शुक्रवारला त्याला रात्री सात सुमाराला घटनास्थळ वाजताच्या परिसरात नेले. दारू पाजली आणि लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करून त्याचा खून केला.