पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची शिंदे कुटुंबीयांना भेट शरद पवार यांचे कडूनही विचारपुस

0
551

चंद्रपूर : भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार निळकंठराव शिंदे यांचे दि. 14 ला निधन झाले होते. शिंदे कूटुंबीयांच्या दुखात सहभागी होत आज (दि.18) ला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देली व कुटुंबीयांचे सांत्वन केले.

स्व. निळकंठराव शिंदे यांचे शरद पवार यांचेशी निकटचे संबध होते. त्यामुळे पवार कुटुंबीयांनी देखील भ्रमणध्वनीवर शिंदे कुटुंबीयांची विचारपुस केली. व दुखात सहभागी असल्याचे कळविले.
याप्रसंगी श्रीमती शिंदे, प्रशांत शिंदे, डॉ. विवेक शिंदे, डॉ. वैभव शिंदे, डॉ. कार्तिक शिंदे, डॉ. विशाल शिंदे, जिल्हा बैन्केचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे, आदी कुटुंबीय उपस्थित होते.