चंद्रपुर जिल्ह्यात शिवपांदण रस्ते बांधकाम अभियान सुरु करा : रवि शिंदे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदनातून मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यात शिवपांदण रस्त्यांच्या समस्येला भिषण स्वरुप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील पांदण रस्ते अदृष्य होत असल्याने शेतीच्या मशागतीकरीता फार मोठा अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे संपुर्ण जिल्हाभरात शिवपांदण रस्ते बांधकाम अभियान राबविण्यात यावे अशी मागणी दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवि शिंदे यांनी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचे कडे आज (दि.१८) ला एका निवेदनातून केली आहे.

भारत हा कृषीप्रधान देश आहे व शिवपांदण रस्ते हा शेतक-यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवपांदण रस्त्यांमुळे शेती करण्यास सोयीचे होते. त्याचा शेती हंगामावर थेट परीणाम होतो. शिवपांदण रस्ते मजबूत असतील तर पावसाळ्यात शेतात ये-जा करण्यास सोयीचे होते. पांदण रस्ते, शिव रस्ते व दाणीच्या रस्त्यांची नोंद नकाशावर किंवा शेतीच्या सातबारा वर केलेली असते. या रस्त्यांची पाहणी करुन सदर रस्ते खुले केल्या जावू शकते. नकाशात किंवा सातबारा वर नोंद नसलेल्या परंतु शेतकरी बांधवांना शेतात जाण्याकरीता रस्ता आवश्यक असेल तर संबधीत शेतकरी बांधवांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम १४३ नुसार रस्ते तयार करुन दिल्या जावू शकतात. शासनाने जिल्ह्याभरात सदर अभियान राबवूण शेतक-यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा, असे रवि शिंदे यांनी या निवेदनात नमुद केले आहे.
या निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना देखील देण्यात आल्या आहेत.