घुग्घुस : काँग्रेस पक्षाचे नेते, गोरगरीब जनतेचे कैवारी खा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने आज शनिवारला घुग्घुस युवक काँग्रेसच्या वतीने गोर गरीब गरजू लोकांना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
सध्या कोरोना महामारी मुळे गोर गरिबांवर उपासमारीची वेळ येत आहे त्यांना मदत म्हणून शालिक राम नगर, शिव नगर व बहीरम बाबा नगर मध्ये गरजू लोकांना धान्य किट वाटप करण्यात आले. आणि सरकारी दवखान्यात फळ वितरण करण्यात आले.
यावेळी सुरज कन्नूर चंद्रपूर जिल्हा उपाधयक्ष युवक काँग्रेस, तौफिक शेख शहर अध्यक्ष युवक काँग्रेस, शेखर तंगलपेल्ली, निखिल पुनगंटी, निरंजन कोंड्रा, श्रिकुमार कोंकटी, राजकिरण कोंकटी, सुनील कनकम, प्रशांत सिल्का, कासिम शेख व नितिन दुर्गम आदी पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.