परमबीर सिंग यांच्या पत्रावर स्वाक्षरी नाही; ईमेलसह पत्राबाबत शहानिशा सुरू- मुख्यमंत्री कार्यालय

0
357
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
मुख्यमंत्री कार्यालयाला [email protected] या ईमेल पत्त्यावरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेले पत्र मिळाले आहे. हा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

मुंबई : परमबीर सिंग यांनी पाठविलेल्या पत्रावरून राज्यातील वातावरण तापले असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्राची खातरजमा करण्यात येत आहे. गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर शनिवारी दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. मात्र, त्यावर केवळ नाव लिहिलेले असून त्यावर स्वाक्षरी नाही. पत्र हे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच पाठविले की नाही, याबाबत शहानिशा सुरू असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाला [email protected] या ईमेल पत्त्यावरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेले पत्र मिळाले आहे. हा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे परमबीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. वास्तविक पाहता परमबीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे. त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.