Chanda Ordnance School प्राचार्यांची बदली; विद्यार्थी धरणेवर विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले प्राचार्य एम. रंगाराजू

0
682
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मागील चार वर्षापासून विविध शैक्षणिक सुविधा पूर्वीत विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्राचार्यांची बदली झाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आज सकाळी आठ वाजेपासून एक वाजेच्या दरम्यान भद्रावती येथील चांदा ऑर्डनन्स फॅक्टरी हायर सेकंडरी स्कूलच्या आवारामध्ये धरणे करून प्राचार्यांची बदली रद्द करावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली. एक वाजताच्या सुमारास शाळेच्या व्यवस्थापनाने धरणेवर बसलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले.

भद्रावती येथील चांदा ऑर्डनन्स फॅक्टरी हायर सेकंडरी स्कूल मध्ये स्थानिक आणि तालुक्यातील बरेच गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा मागील चार वर्षांपासून प्राचार्य प्रेम रंगाराजू यांच्या पुढाकारातून मिळत आहेत. प्राचार्य रंगाराजू हे चार वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात शाळेची शैक्षणिक प्रगती वाढलेली आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा त्यांनी स्वताच्या पगारा मधूनही पुरविलेल्या आहेत. विद्यार्थी गरीब असो की श्रीमंत त्यांच्यासाठी सातत्याने शैक्षणिक दृष्ट्या धावून येण्याचे काम प्राचार्य रंगाराजू यांच्या माध्यमातून होत आहे. एवढेच नव्हे तर कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल त्यांनी पुढाकार घेतलेला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांकरता पैशाने होणारे ट्युशन बंद करून शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा कसा वाढवला जाऊ शकतो यावर काम करून त्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती उत्तरोत्तर वाढविली आहे. त्यामुळे प्राचार्य रंगाराजू हे विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

या शाळेमध्ये 35 शिक्षक कार्यरत आहेत तर 1100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपासून शाळेच्या व्यवस्थापनाकडून प्राचार्य रंगाराजू यांना हटविण्याच्या हालचाली सुरू होत्या. काल काल दुपारी बारा वाजता प्राचार्यांना बदलीबाबतचे नोटीस मिळाले आणि लगेच कार्यमुक्त करण्यात यावे असा आदेश देण्यात आला. सदर प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांना लागली त्यामुळे विद्यार्थी प्राचार्यांच्या बाजूने धावून आले. आज शनिवारी सकाळच्या पाळीत शाळा असताना शाळेच्या आवारातच अकराशे विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची पबदली रद्द करावी यासाठी धरणे सुरू केले. एवढेच नव्हे तर पालकही पाल्यांच्या मदतीला येऊन कोणत्याही परिस्थितीत प्राचार्यांना या ठिकाणी ठिकाणावरून जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. सकाळी आठ वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत विविध प्रचार्यांच्या समर्थनात घोषणाबाजी करून विद्यार्थ्यांनी धरणे दिलेत. एकच्या सुमारास शाळा व्यवस्थापनाने धरणेवर बसलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्राचार्य एम उभे राहिल्याने प्राचार्यांच्या बदलीचे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्राचार्य प्राचार्य रंगाराजू सध्या भद्रावती येथेच आहेत. विद्यार्थ्यांच्या या पवित्र्यामुळे त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या समर्थनात डॉ पवित्रा घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याकरता प्राचार्य काही दिवस या ठिकाणी राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.