स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळणार : युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई 

चंद्रपूर : महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भगवी लाट आली आहे. एकीकडे महाराष्ट्रातील लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्ह्यातील मजबूत संघटन यामुळे येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळणार असल्याचा विश्वास युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले सरदेसाई शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, अभय गोरे, रुपेश कदम, राहुल कनान उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ही केवळ महाराष्ट्रात नसून संपूर्ण देशात आहे. त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे त्यामुळे येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळणार आहे.