‘नियमांचे पालन करा, अन्यथा पुन्हा टाळेबंदी’  नाईट कर्फ्यू लावण्याचा सरकारचा विचार – विजय वडेट्टीवार

0
309
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र, वारंवार सांगूनही लोक विनामास्क फिरत आहेत. यामुळे आता काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कर्फ्यू लावण्यासंदर्भात अधिकार देण्यात आले आहेत.

नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लवकरच सायंकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, असे संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना येथे दिले.

कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यासंदर्भात सरकार वारंवार आवाहन करीत आहे. मात्र, असे असतानाही काही लोकांनी हे नियम पार धाब्यावर बसवले आहेत. यामुळे आता राज्य सरकार पुन्हा नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करीत आहे. मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे आदी गोष्टी नागरिकांनी पाळायला हव्यात, असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र, वारंवार सांगूनही लोक विनामास्क फिरत आहेत. यामुळे आता काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कर्फ्यू लावण्यासंदर्भात अधिकार देण्यात आले आहेत. संबंधित जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कोरोनाचा प्रसार आणि तेथील गर्दी, लक्षात घेऊन नाईट कर्फ्यूसंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील असेही वडेट्टीवार म्हणाले.

मंगल कार्यालयांवर कारवाई

मास्कचा वापर करणे, अंतर राखणे, गर्दी टाळणे या गोष्टी नागरिकांनी पाळायला हव्यात. लग्न समारंभातील गर्दी टाळण्यासाठी आता आम्ही मंगल कार्यालयांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.