घुग्घुस : येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा येथे फक्त 30 वर्षा वरील ते 44 वर्षा पर्यंत वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली.
यावेळी घुग्घुस शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे, घुग्घुस तभा प्रतिनिधी संजय पडवेकर काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी घुग्घुस येथील जि.प. कन्या शाळेतील लसीकरण केंद्रात जाऊन रांगेत लागून कोविशिल्डची लस लावून घेतली. तसेच राजीव रतन केंद्रीय चिकित्सलाय घुग्घुस येथे ही मोहीम राबविण्यात आली.
आज सोमवारला सकाळ पासून लसीकरण केंद्रावर नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा लसीकरण केंद्रात 100 कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध होता.
या मोहिमेत समुदाय अधिकारी सालेहा सिद्दीकी, आरोग्य सेविका ए.जे. वानखडे, अंगणवाडी सेविका पूजा गावंडे, वंदना डांगे सहभागी झाल्या होत्या.