चंद्रपूर : अनेक दिवसांपासून कोरोनाच्या काळात रोजगार गेलेल्या नागरिकांनी छोटे खाणी हातठेल्यावर भाजी विक्री चे दुकान लावले या हात ठेल्यावर भाजीविक्री करण्याऱ्या किरकोळ विक्रेत्यांची दुकाने कोणतीही पूर्वसूचना न देता नगर परिषद ने उठविली भाजी विक्रेत्यांना बांधून दिलेल्या शेड मध्ये दुकान लावण्यास सांगितले.
जिल्हा खनिज निधीतून बांधण्यात आलेले शेड आठवडी बाजारात म्हणजे मटण, चिकन मार्केट ला अगदी लागून असल्यामुळे तिथल्या दुर्गंधी व माश्यामुळे ग्राहक जात नाही आहे. गेल्या चार दिवसांपासून भाजी विक्रेत्यांनी आणलेला माल शेवटी फेकून द्यावा लागत आहे त्यामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळेच आज भाजी विक्रेत्यांनी नगर परिषदेवर भाजी चे ठेले घेऊन धडक दिली त्यावर सुद्धा कुठेही तोडगा निघालेला नाही तर भाजी विक्रेत्यानी सांगितले की त्यांनी मुख्यधिकारी व नगराध्यक्ष याना भेटायला सुद्धा आत मध्ये जाऊ दिले नाही व चर्चा पण करू दिली नाही तर लोकप्रतिनिधीनि सुद्धा यांच्या कडे दुर्लक्ष केले असे मत त्यांनी बोलून दाखविले भाजी विक्रेत्यानी न्याय कुणाला मागाचा असा प्रश्न सर्वांना आला.
किरकोळ भाजी विक्रेते आंदोलनाच्या तयारीत
भाजी विक्रेत्यानी दोन दिवसात जर न्याय नाही मिळाला तर सर्व किरकोळ भाजी विक्रेते आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार असा सढळ इशारा नगर परिषद ला दिला.
आमच्या आधार न्यूज नेटवर्क चे प्रतिनिधींनी यांनी अधिक माहिती घेण्याकरीत मुख्यधिकारी व नगराध्यक्ष मॅडम याना फोन केला असता फोन उचलण्यात आला नाही असे कळवले.