चंद्रपूरच्या ऐतिहासिक गोंडकालीन किल्लावर इको-प्रो कडून योगातून आरोग्य जपण्याचा संदेश

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆ आरोग्यासाठी योगा, व्यायाम करिता किल्ला परकोटाचा वापर करीत वारसा संवर्धन करण्याचे बंडू धोतरे यांचे आवाहन

चंद्रपूर : जागतिक योग दिनाचे दिवशी आज सोमवारी चंद्रपुर किल्ला परकोट वरुन योग दिन साजरा करित, आपले आरोग्य व शहरातील ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याच्या संदेश इको-प्रो संस्थेच्या वतीने देण्यात आला.

चंद्रपुर शहरातील 11 किमी लांब, 550 वर्ष प्राचीन गोंड़कालीन किल्ला परकोटची स्वच्छता अभियान सलग एक हजार अधिक दिवस निरंतर चालवित स्वच्छता केली. यानंतर याच किल्ला वरुन पर्यटन करिता हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. सोबत या किल्ल्याचे संरक्षण व्हावे, स्वच्छता कायम राहावी म्हणून “योग दिनाचे” आयोजन केले जाते.

चंद्रपुर किल्ला परकोटाला जवळपास 39 बुरुज 4 मुख्य गेट आणि 5 खिड़की आहेत या ठिकाणी किल्लावर योगा, व्यायाम करण्यास उत्तम जागा आहे. ही ठिकाणे शहराच्या सभोवताल आहेत. या सर्व ठिकाणी स्थानिक नागरिक, युवक किंवा योग समितीनी नियमित वापर केल्यास कायम स्वच्छता राहिल, असामाजिक तत्वाचा वावर राहणार नाही. आणि आपल्या।शहरातील ऐतिहासिक् वारसा संरक्षण, संवर्धन करण्यास लोकसहभाग सुद्धा मिळविणे सहज शक्य होईल. म्हणून इको-प्रो तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
आज पहाटे रामाळा तलाव लगत बगड़ खिड़की, बुरुज 4 वरुन, इको-प्रो कार्यकर्ते यांनी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे नेतृत्वात योग दिनाचे कार्यक्रम घेतला, यावेळेस संस्थेचे नितिन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, रवि गुरनुले, संजय सब्बनवार, अब्दुल जावेद, राजू काहीलकर, कुणाल देवगिरकर, सुधीर देव, राजेश व्यास, कपिल चौधरी, प्रमोद मलिक, जयेश बैनलवार, सचिन धोतरे, सुमित कोहले, श्रीकांत तीपर्तिवार, प्रितेश आदि सदस्य सहभागी झाले होते.