बोर्डा झुल्लुरवार रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीस टाळाटाळ

0
126
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराला खतपाणी

चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील मौजा बोर्डा झुल्लुरवार येथे रोजगार हमी योजनेत मोठा घोळ झाल्याची बाब माहिती अधिकारातून उलगुलान संघटेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उघड करुन त्याची तक्रार येथील संवर्ग विकास अधिकारी व तहसीलदार यांचेकडे दिली होती. मात्र येथील संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी कोणतीही चौकशी न करता तक्रारकर्त्यांना हुसकावून लावले. व चौकशी करण्यास टाळाटाळ करुन उघड झालेल्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचे एंकदरीत कार्यावरुन वास्तव चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे तक्रार कर्त्यांनी संवर्ग विकास अधिकारी यांचेकडून चौकशीला होत असलेल्या दिरंगाई मुळे याप्रकणाची रितसर व प्रामाणिक चौकशी व्हावी याकरीता जिल्हाधिकारी साहेबांकडे दिनांक १५.०३.२०२१ ला तक्रार दाखल करुन या प्रकरणाचा पत्रपरिषदेत खुलासा केला.

या तक्रारीवरून येथील संवर्ग विकास अधिकारी यांनी दिनांक १६.०३.२०२१ ला विस्तार अधिकारी अशोक साळवे व रोजगार हमी योजनेचे प्रोग्राम असिस्टंट हेमंत येरमे यांना पाठवले.परंतु बोर्डा झुल्लुरवार येथे रोजगार हमी योजनेच्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करीता गेलेल्या अधिकाऱ्यांनी फक्त त्या गावात हजेरी लावून तक्रारकर्त्यांना याची कोणतीही माहिती व प्रत्यक्ष न बोलावता केवळ सरपंच गौतम रामटेके यांचा बयान घेतला. या बयानात सरपंच रामटेके यांची स्पष्ट सांगत रोजगार हमी योजनेत मोठा घोळ झाला असून ज्या बोगस नावाने रोजगार हमी योजनेचा निधी अफरातफर झाला ती मंडळी कधीच कामावर न गेल्याचे स्पष्ट केले. चौकशी करीता गेलेल्या अधिकाऱ्यांनी ज्या बोगस मजुरांच्या नावाने निधी अफरातफर झाला आहे असे तक्रारीत स्पष्ट नमूद असतांना सुद्धा त्यांना कोणत्याच प्रकारची विचारपूस केली नाही व चौकशी करीता आलेले अधिकारी परतून गेलेत.

त्यामुळे या भ्रष्टाचार प्रकरणाला पोंभुर्णा पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे व चौकशी करण्यास गेलेले विस्तार अधिकारी अशोक कुर्जेकर व प्रोग्राम असिस्टंट हेमंत येरमे यांनी या भ्रष्टाचार प्रकरणाला खतपाणी घालत असल्याने गावातील नागरिकांत मोठा रोष निर्माण झाला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणाची जर प्रामाणिक व रितसर चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास संतापलेल्या नागरिकांना घेऊन उलगुलान संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांच्या नेतृत्वात पोंभुर्णा तालुका अध्यक्ष अंशुल यांनी व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.