जागतिक वनदिनी अतुलनिय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

0
168
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

प्रशस्तिपत्र वाटप, मध्य चांदा वनविभागाचा नविन उपक्रम

चंद्रपुर : रविवारी रोजी जागतिक वनदिनानिमीत्य उपवनसंरक्षक कार्यालय, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर येथे वनविभागामध्ये वनसंरक्षण व वनसंवर्धन करुन अतुलनिय काम करणाऱ्या 30 वनरक्षक, वनपाल व वाहनचालक तसेच उत्कृष्ठ कार्यालयीन कामे पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांस त्यांच्या कार्यालयात गौरव करुन प्रशस्तिपत्र वितरीत करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अरविंद मुंढे, उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर, श्री. प्रितमसिंह कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक, श्री. अमोल गर्कल, सहाय्यक वनसंरक्षक तसेच मध्य चांदा वनविभागाचे सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते. वन्यप्राणी शिकार प्रकरणे, वनजमिनीवरील अतिक्रमण हटविणे, वनाचे आगीपासुन संरक्षण करणे, उत्कृष्ठ रोपवने तयार करणे, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे बळकटीकरण करणे व पर्यटनाच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध करुन देणे, वनप्राण्यांच्या हालचालीचे संनियंत्रण करुन मानव व वन्यजिव संघर्ष टाळण्याकरीता उपाययोजना करणे इत्यादी बाबीमध्ये अतुलनिय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार व प्रशस्तिपत्र वितरीत करण्यात आले. या प्रसंगी श्री. अरविंद मुंढे, उपवनसंरक्षक मध्य चांदा चंद्रपुर यांनी जागतीक वनदिनाचे महत्व आणी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रेरणा देऊन वनसंवर्धन, वनसंरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.