घुग्घुस : येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात सोमवार 21 जून रोजी सकाळी 6 वाजता दरम्यान आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम 2015 मध्ये 21 जून हा वर्षभरातील सर्वात मोठा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन जगाला केले होते. आज जगातील सर्व देशात हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.
द्विप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली उपस्थितांना योग शिक्षक नामदेव मोरे यांनी योग अभ्यासाचे प्रात्यक्षित व धडे दिले. या कोरोना संकटात योग ला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
यावेळी घुग्घुस जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विठोबा पोले, पर्यवेक्षिका सौ. विना उमरे, सरिता नंदुरकर, चंद्रशेखर बोबडे, अनिल ठाकरे, ज्ञानेश्वर सोनकुसरे, विशाल नगराळे, हेमंत बुटले, लिपिक सुरेंद्र भोंगळे, विजय साखरकर, सत्यनारायण खोके व कर्मचारी उपस्थित होते.