पिपरी ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा

0
209

सरपंचपदी वैशाली माथणे उपसरपंच हरिओम पोटवडे

चंद्रपूर : तालुक्यातील पिपरी येथील ग्रामपंचायत निवडणूक पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु धानोरकर, कृषी बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांच्या मार्गदर्शनाखाली तर चंदू माथने, गणेश आवारी यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली.
यामध्ये महाविकास आघाडी पॅनल तर्फे गणेश आवारी, भुवन चिने, वैशाली माथने, मायाताई मुसळे,वर्षा निब्रड,सुनीता मत्ते निवडून आले.
सरपंचपदी वैशाली माथने व उपसरपंचपदी हरिओम पोटवडे यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती रोशन पचारे, घुग्घुस काँग्रेस कमेंटी अध्यक्ष राजुरेड्डी यांनी नवनियुक्त सदस्य तसेच सरपंच उपसरपंच यांचे स्वागत केले.