हा शॉर्टकट् रस्ता कुणासाठी जनतेसाठी की आमदारांसाठी : काँग्रेस नेते रोशन पचारे

0
479

घुग्घुस : येथील वस्ती परिसरात आमदार कीशोर जोरगेवार यांच्या मालकीचा स्नेहप्रभा सभागृह आहे.व या सभागृहातच आमदार जोरगेवार यांचा जनसंपर्क कार्यलय आहे.या सभागृहात व कार्यलयात येणे जाणे सोपे व्हावे म्हणून घुग्घुस पोलीस स्टेशन ते एसीसी मुख्य मार्गावरील डिवायडर तोडून रस्ता बनविण्यात आलेला आहे.

मुख्य मार्गावर मधातच रस्ता काढल्यामुळे याठिकाणी अपघाताची त्रिव शक्यता बळावली आहे.
याठिकाणी अपघात होऊन नागरिकांचा जीव गेल्यास याला जवाबदार कौन राहणार आहे स्वतःच्या सुविधेसाठी रस्ता बनवून घेणारे आमदार की आमदारांच्या सुविधेसाठी रस्ता बनवून देणारी एसीसी कंपनी असा संतप्त प्रश्न जिल्हा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी उपस्थित केला आहे.
व हा रहदारीचा मार्ग पूर्वव्रत करून नागरिकांच्या जीवनाशी खेळणे बंद करावे अशी मागणी एसीसी व्यवस्थपकाला पचारे यांनी निवेदनातुन केली आहे.