दूध का दूध, पाणी का पाणी करावे गृहमंत्री यांचं ट्विट

0
214
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे. राज्य शासना्च्या या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करत ‘दूध का दूध, पाणी का पाणी करावे’, असं म्हटलं आहे.

दूध का दूध, पाणी का पाणी करावे;
राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट केलं. “मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते”, असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. यावेळी सरकारची बाजू राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमोर मांडली जाणार आहेत. तत्पूर्वी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यातील सर्व प्रकरणाबाबत राज्य सरकारकडून तातडीने अहवाल मागवण्याची मागणी भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे.