ओबीसींच्या अस्मितेसाठी २४ जुनच्या निदर्शनात सहभागी व्हा : डॉ. अशोक जिवतोडे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २४ जुनला राज्यभर जिल्हाकचेरी व तहसिलकार्यालयासमोर निदर्शने

चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाने वारंवार मोर्चे, आंदोलन, निदर्शने, निवेदन, देऊन मागणी करुनही केंद्र सरकार ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करीत नाही ऊलट ओबीसींचे विविध क्षेत्रातील आरक्षण कमी करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने स्थानिक स्वराज संस्थेतील राजकीय आरक्षण सध्या रद्द झाले आहे, राज्य सरकारने आयोग नेमुन इम्पेरीकल डाटा सुप्रीम कोर्टासमोर त्वरीत मांडावे ज्यामुळे ओबीसींचे आरक्षण पुर्ववत होईल, महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यातील कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे व ओबीसींच्या इतर केन्द्र व राज्य सरकार कडे प्रलंबीत मागण्या मंजूर करण्यासाठी आता निकराची लढाई लढावी लागेल त्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २४ जुनला राज्यभर जिल्हाकचेरी व तहसील कार्यालय समोर निदर्शने होत आहेत.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, यांच्या माध्यमातून सर्व राज्यात २४ जुन रोज गुरुवारला सकाळी १२ वाजता जोरदार निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी समाजाने स्थानिक जिल्हा कचेरी व तहसील कार्यालयासमोर बहुसंख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. अशोक जिवतोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जेष्ठ बबनराव फंड, बबनराव वानखेडे, दिनेश चोखारे, जिल्हाध्यक्ष नितिन कुकडे, प्रा. सुर्यकांत खनके, प्रा. अनिल शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष जोत्सना राजुरकर, शाम लेडे, डॉ. संजय बरडे, प्रा. बबन राजूरकर, विजय मालेकर, अनिल काळे, गोविंदा पोडे, अविनाश पाल, योगिता लांडगे, उमेश काकडे, प्रा. अशोक पोफळे, संतोष देरकर, बादल बेले, गजानन अगडे, वसन्ता भोयर, गणपती मोरे, बाळू दिवसे, कैलाश चलाख, संतोष बांदुरकर, राजु निखाड़े, पवन राजुरकर, रवि शेंडे, मांडवकर सर, दिगांबर चौधरी सर, कंटीवार सर, लक्ष्मण मेश्राम, शेख, कवींद्र रोहनकर, नितिन खरवडे, तुळशीदास भुरसे, प्रणव ऊलमाले, योगेश पेंटेवार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व शाखाचे पदाधिकारी, ओबीसी च्या सर्व संघटना, ओबीसीत मोडणाऱ्या सर्व जात संघटना आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.