
घुग्घुस : ग्रामपंचायतला नगरपरिषद घोषित करण्याची तैयारी शुरू असून जिल्हा परिषदचा एक मुख्य अधिकारी दोन दिवसांपूर्वी मुंबई नगर विकास विभागात दाखल झालेला आहे.
तेथून सूत्र हलताच जिल्हापरिषद येथून जिल्हापरिषदचे महिला सभापती, पंचायत समितीचे उपसभापती, पंचायत समिती सदस्य यांना घुग्घुस नगरपरिषद संदर्भात मत देण्यासाठी पत्र पाठविण्यात आलेले आहे.
सौ. रंजीता पवन आगदारी ह्या नगरपरिषदच्या बाजूने आपले मत देणार असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळाले आहे.
महिला सभापती व पंचायतसमिती उपसभापती यांच्या अभिप्राया कडे घुग्घुस वासीयांचे लक्ष लागले आहेत.
आज पासून नामांकनाला सुरुवात होत आहे.
नगरपरिषदची उत्कंठा अत्यन्त शिगेला पोहचली आहे.