समाजाला दिशा देणाऱ्या शिक्षकातर्फेच सोशल डिस्टन्सचा फज्जा

0
111

वाढदिवासाची जंगी पार्टीत नेत्यांसह शेकडोची उपस्थिती ना मास्क ना सामाजिक अंतर

चंद्रपूर / घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग अत्यंत वेगाने पसरत असून 336 इतके संक्रमित रुग्ण संख्या झाली असून एका महिलेचा मृत्यू देखील झाल्याचे कळत आहे. प्रशासन रात्र- दिवस कोरोना आटोक्यात आणण्याकरिता सतत प्रयत्न करीत आहे.

जिल्हाधिकारी वारंवार सामाजिक अंतर राखण्याचा व सजग राहण्याचा आवाहन करीत आहे.
मात्र शासन नियम वेशीवर टांगून वारंवार घुग्घुस येथे जमाव करून सामाजिक कार्यक्रम, जनधन खाते, पोलीस स्टेशनला सुरक्षाकीटचे वितरण, व वाढदिवसाला गर्दी करणाऱ्या नेत्यांवर कारवाई का करीत नाही हा जनतेला प्रश्न पडला आहे.
कायदे फक्त जनतेसाठी असून मात्र नेत्यांसाठी “हम करे सो कायदा” हाच नियम आहे नागरिकांना कोरोना पासून सुरक्षेचे धडे देण्याकरिता चौका – चौकात बॅनर लावणारे नेते स्वतःच कोरोनाला आमंत्रण देत आहे हे विशेष.
मागील 08 दिवसापासून चंद्रपूर शहरात परत टाळेबंदी लागू करण्यात आले असून कोरोना वॉरीयर शर्तीचे प्रयत्न करीत आहे.
असे असतांना ही जिल्हा पासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर असलेले घुग्घुस शहर सुदैवाने अजून पर्यंत कोरोना विषाणूच्या महामारीपासून सुरक्षित आहे.
मात्र घुग्घुस येथील राजकीय नेते व शिक्षक हेच संचारबंदीच्या नियमांचे सातत्याने फज्जा उडवीत आहे.
दोन दिवसांपूर्वी एका नेत्यांचा जंगी वाढदिवस साजरा करण्यात आला तर नुकतेच राजकीय नेते असलेले शिक्षक ज्यांच्यावर समाजाला दिशा दाखविण्याची जवाबदारी असते.
या शिक्षकांच्या वाढदिवसाला अनेक केक सह व शेकडो समर्थकासह सोशल डिस्टन्सचा भान न ठेवता, तोंडाला मास्क न लावता संचारबंदी नियमाचे पालन न करता धडाक्यात व जल्लोषात वाढदिवस साजरा केला.
भद्रावती येथे एका लग्न संभारंभात गेलेल्या दाम्पत्यामुळे पूर्ण शहर दहशतीत आला आहे.मूल येथे तसेच जवळील ग्रामीण क्षेत्रात मोठ्या संख्येने रुग्ण मिळाले आहे.
अश्या वाढदिवसीय कार्यक्रमामुळे घुग्घुस येथे कोरोना पसरू नये जनतेची एवढीच माफक अपेक्षा आहे.
आणि पसरल्यास नागरिकांच्या जीवनाशी खेळ मांडणाऱ्या या नेत्यांवर कायदेशीर कारवाई होईल का ?
असा जनतेच्या मनात शंका उपस्थित झाली आहे