तीन कोटी रुपये खर्च करून दुरुस्तीचे काम | चंद्रपूर – वणी, यवतमाळ बेलोरा पुलाचे काम अपूर्ण मात्र वाहतूक सुरू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : चंद्रपूर – वणी, यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या वर्धा नदी बेलोरा पुल धोकादायक स्थितीत असल्यामुळे दुरुस्तीसाठी मागील महिनाभरापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान, पुलाच्या एका बाजुची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर पुल पुन्हा वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूची दुरुस्ती केली जात आहे. तीन कोटी रुपये खर्च करून वर्धा नदीवरील बेलोरा येथील पुलाचे बेरिंग बदलविण्याचे तसेच मायको काँक्रेटीकरणाचे काम करण्यात येत आहे. या पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्र पाठवून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यासंदर्भात कळविले होते. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून इतरत्र वळविण्यात आली होती. या पुलावरून कोळसा वाहतुकीबरोबरच गडचांदूरकडून मुंबईकडे मोठ्या संख्येने बाहने जातात. पुल धोकादायक स्थितीत असल्यामुळे अपघाताची शक्यता होती.

मागील वर्षी या पुलाच्या मायक्रो काँक्रीटीकरणावर एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. यावेळी वाहतूक बंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे एका वर्षात परत पुलावरील रस्त्याची स्थिती जैसे – थे झाली.

घुग्घुसचे सामाजिक कार्यकरता ईबध्दूल सिद्धीकी
वारंवार तक्रारी करून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयल केला. त्यानंतर संबंधित कंत्राटदावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, शासनाने राज्यातील सर्व पुलांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुनर्निरीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी या पुलाचे निरीक्षण केले असता धानोरा व बेलोरा पुलाचे बेरिंग बदलविणे व मायक्रो काँक्रीटीकरण करण्याचे त्यांनी निरीक्षणामध्ये नमूद केले होते.